सुंदर आणि निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी टिप्स डोळे चांगले ठेवण्यासाठी निरोगीव संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात भरपूर किंवा फळे आणि भाज्यांचा समावेश करा., विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच वजन आटोक्यात ठेवा. व्यायामामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यात मदत होऊ शकते. या आजारांमुळे डोळ्यांच्या किंवा दृष्टीच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळे खराब होऊ शकतात आणि मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका वाढू शकतो. UV-A आणि UV-B दोन्ही रेडिएशन 99 ते 100% रोखतील असे सनग्लासेस वापरून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करा. डोळ्यांना दुखापत होऊ नये म्हणून, काही खेळ खेळताना किंवा जोखमीचे काम करताना डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे. धुम्रपान टाळा. धूम्रपानामुळे मॅक्युलर डिजे...
निरोगी शरीर (health) हवे असेल तर शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी असणे महत्वाचे ठरते. निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहारासोबतच योग्य वजन (weight) राखणेही आवश्यक आहे. बर्याच लोकांना चांगला आहार न मिळाल्याने ते अशक्त आणि कमी वजनाचे बनतात, तर काहीजण चुकीच्या खाण्यामुळे लठ्ठ होतात. अशा परिस्थितीत मेटाबॉलिज्म (metabolism) योग्य ठेवणे हा या समस्येवर उपाय ठरू शकतो. चांगले मेटाबॉलिज्म पचन सुधारते आणि शरीर अन्नातून पोषण शोषण्यास सक्षम होते. वाढलेल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि निरोगी वजन राखण्यासाठी, शरीरातील मेटाबॉलिजमची काळजी घेतली पाहिजे. मेटाबॉलिजम वाढवण्याचे व कॅलरी बर्न करण्याचे काही उपाय जाणून घेऊया. स्वयंपाकाच्या तेलाकडे लक्ष द्या मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी मीडिअम चेन ट्रायग्लिसराइड (MCT)वापरा. नारळाच्या तेलासारख्या एमसीटीमध्ये लॉरिक ॲसिड भरपूर असते जो मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी काम करतो. थंड पाण्याने अंघोळ करा व कॅलरी कमी करा थंडी वाजल्यामुळे ब्राऊन फॅट ॲक्टिव्हेट होते. गार पाण्याने अंघोळ केल्यामुळे फ्रेश वाटते आणि फिटनेसही वाढतो. मसल्ससह मेटाबॉलिक रेट वाढवा मसल्स वाढल्याने इन्सुलिनची संवेदनशील...
निरोगी हृदयासाठी हेल्थ टिप्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान सोडा. कोरोनरी हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी धूम्रपान हे एक प्रमुख कारण आहे. सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा. सक्रिय राहणे तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायाम हा एक उत्तम मूड बूस्टर आणि स्ट्रेस बस्टर आहे. दर आठवड्याला 150 मिनिटे मध्यम-तीव्रता एरोबिक व्यायाम करा. हे लक्ष्य साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटे व्यायाम करणे. तुम्हाला जेथे शक्य असेल तेथे चालत जा किंवा सायकल चालवा. तुमचे वजन व्यवस्थापित करा. जास्त वजनामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमित शारीरिक हालचालींसह भरपूर फळे आणि भाज्या, चरबी आणि कमी साखर असलेला निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार घ्या. भरपूर फायबर खा. हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करण्यासाठी दिवसातून किमान 30 ग्रॅम फायबर खा जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कमी फॅट्स असलेले पदार्थ आहारात घ्या. च आहारात मीठ कमी करा. निरोगी रक्त...
Comments
Post a Comment