Posts

Showing posts from January, 2023

सुंदर आणि निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी टिप्स

सुंदर आणि निरोगी डोळ्यांसाठी आरोग्यदायी टिप्स   डोळे चांगले ठेवण्यासाठी निरोगीव संतुलित आहार घ्या. तुमच्या आहारात भरपूर किंवा फळे आणि भाज्यांचा समावेश करा., विशेषतः हिरव्या पालेभाज्या आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ खाल्ल्याने डोळ्यांना फायदा होतो. जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेहामुळे डायबेटिक रेटिनोपॅथी किंवा काचबिंदू होण्याचा धोका जास्त असतो. म्हणूनच वजन आटोक्यात ठेवा.  व्यायामामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यात मदत होऊ शकते. या आजारांमुळे डोळ्यांच्या किंवा दृष्टीच्या काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.  तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळे खराब होऊ शकतात आणि मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका वाढू शकतो. UV-A आणि UV-B दोन्ही रेडिएशन 99 ते 100% रोखतील असे सनग्लासेस वापरून आपल्या डोळ्यांचे संरक्षण करा.   डोळ्यांना दुखापत होऊ नये म्हणून, काही खेळ खेळताना किंवा जोखमीचे काम करताना डोळ्यांचे संरक्षण आवश्यक आहे. धुम्रपान टाळा. धूम्रपानामुळे  मॅक्युलर डिजे...

निरोगी हृदयासाठी हेल्थ टिप्स

निरोगी हृदयासाठी हेल्थ  टिप्स   हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी धूम्रपान सोडा. कोरोनरी हृदयविकाराच्या मुख्य कारणांपैकी धूम्रपान हे एक प्रमुख कारण आहे.  सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करा. सक्रिय राहणे तुमच्या हृदयविकाराचा धोका कमी करू शकते. व्यायाम हा एक उत्तम मूड बूस्टर आणि स्ट्रेस बस्टर आहे.  दर आठवड्याला 150 मिनिटे मध्यम-तीव्रता एरोबिक व्यायाम करा. हे लक्ष्य साध्य करण्याचा एक मार्ग म्हणजे आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटे व्यायाम करणे. तुम्हाला जेथे शक्य असेल तेथे चालत जा किंवा सायकल चालवा.  तुमचे वजन व्यवस्थापित करा. जास्त वजनामुळे हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नियमित शारीरिक हालचालींसह भरपूर फळे आणि भाज्या, चरबी आणि कमी साखर असलेला निरोगी, पौष्टिक व संतुलित आहार घ्या. भरपूर फायबर खा. हृदयविकाराचा धोका कमी करण्यात मदत करण्यासाठी दिवसातून किमान 30 ग्रॅम फायबर खा  जास्त प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते. यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. कमी फॅट्स असलेले पदार्थ आहारात घ्या. च आहारात मीठ कमी करा. निरोगी रक्त...

सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स

सुंदर आणि निरोगी केसांसाठी आरोग्यदायी टिप्स   केसांच्या आरोग्यासाठी प्रथिने अत्यंत आवश्यक आहेत. केस आणि टाळूच्या आरोग्यासाठी योग्य आहार हा एक महत्त्वाचा घटक आहे. केस प्रामुख्याने प्रथिनांपासून बनलेले असतात, म्हणून दररोज आहारात किमान 45 ग्रॅम प्रथिने घ्या.  प्रोटीनच्या कमतरतेमुळे केस कमकुवत व ठिसूळ केस होतात. तसेच ते निस्तेज होतात व गळतात.  झिंकच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात. यासाठी आहारात नट्स, अक्रोड, पेकान, काजू आणि बदाम यांसारख्या पदार्थांचा समावेश करा. तसेच आहारात भरपूर प्रमाणात भाज्या, फळे, हिरव्या पालेभाज्या, सॅलड्स घ्या. व भरपूर प्रमाणात पाणी प्या. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट घ्या.  ओमेगा -3 फॅटी ऍसिडचे सेवन वाढवल्याने केसांची मुळे आणि सेबेशियस ग्रंथी उत्तेजित होऊ शकतात. यामुळे टाळूचे आरोग्य सुधारते तुम्ही आठवड्यातून किती वेळा केसांना शॅम्पू लावता यावर देखील केसांचे आरोग्य अवलंबून असते. तुमचे केस तेलकट असतील तर तुम्हाला जास्त वेळेला केस धुण्याची गरज असते. आपल्या केसांची गरज ओळखून त्यानुसार केस धुण्याचे वेळापत्रक ठरवा व शक्यतोवर ऑरगॅनिक ...

निरोगी जीवनासाठी आरोग्यदायी टिप्स मराठी

निरोगी जीवनासाठी आरोग्यदायी टिप्स मराठी   कायम वजनाकडे लक्ष ठेवा आणि योग्य वजन राखा. वजन अतिरिक्त प्रमाणात वाढले तर त्यामुळे अनेक गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.  दररोज किंवा दर आठवड्याला वजन मोजा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आहारात व व्यायामात योग्य ते बदल करता येतील. जंक फूड व फास्ट फूडचे सेवन मर्यादित करा आणि संतुलित आहार घ्या.  रोज सकाळची न्याहारी करण्यास विसरू नका. आहारात प्रोटीन व फायबरचे प्रमाण अधिक ठेवा व फॅट्स आणि साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवा. ताजे, सकस व पौष्टिक जेवण घ्या.  रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी रोजच्या आहारात सिझनल फळे व भाज्यांचा समावेश करा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने मल्टीविटामिन सप्लिमेंट्स घ्या. तुमच्या शरीरात पोषक तत्वांची पातळी योग्य ठेवण्यासाठी दररोज मल्टीविटामिन सप्लिमेंट घेणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण अनेक व्हिटॅमिन्स आपल्याला रोजच्या अन्नातून मिळतीलच असे नाही.  व्हिटॅमिन A, B6, B12, C, D आणि E, तसेच जस्त, लोह, तांबे, सेलेनियम आणि मॅग्नेशियम हे पोषक घटक आपल्या शरीराचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी आवश्यक असतात. म्हणून त्...

निरोगी जीवनशैलीचे महत्त्व

  निरोगी जीवनशैलीचे महत्त्व  उत्तम आरोग्याशिवाय जीवनाला अर्थ नाही. आपले आयुष्य हे निश्चितच मौल्यवान आहे, परंतु आरोग्य (Health In Marathi) अमूल्य आहे. उत्तम आरोग्याची किंमत ही आजारी पडल्यावरच आपल्याला कळते. उत्तम आरोग्याशिवाय जीवन हे चव नसलेल्या अन्नासारखे आहे. आरोग्य आपल्याला आपले जीवन आनंदाने जगण्याची संधी देते आणि आपल्याला आपल्या इच्छेनुसार वाटेल ते करण्यास सक्षम बनवते. आपण जेव्हा निरोगी जीवनशैली जगतो तेव्हाच आपण शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहू शकतो. आपले शारीरिक आरोग्य चांगले असेल तर आपले मन देखील टवटवीत राहते व आपला आयुष्यातला उत्साह टिकून राहतो. निरोगी जीवनशैली आपल्याला अनेक गंभीर आजारांपासून दूर ठेवते आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.  निरोगी जीवनशैली जगल्याने केवळ आपले आयुष्यच वाढत नाही तर आपले शरीर आणि मन देखील टवटवीत राहते. पूर्वी माणसांचे  संपूर्ण आयुष्य निसर्गाभोवतीच केंद्रित असल्याने ते निरोगी जीवनशैलीचे पालन करत असत. आता आपल्याला त्यांच्यासारखे जगायला तर जमणार नाही पण आपण स्वतःला काही चांगल्या सवयी निश्चितच लावून घेतो. या आरोग्यदायी सवय स्वतःला लावून घेणे...

हिवाळ्यात चेहऱ्याची काळजी

  नवीन वर्षाच्या धमाकेदार स्वागतासाठी तुम्ही सज्ज आहात. उत्तम दिसण्यासाटी, उत्तम फोटो काढण्याठी तुम्ही चेहऱ्याची काळजी घेतच असाल. पण ते पुरेस नाही. या हंगामात संपूर्ण शरीराची त्वचाच खडबडीत आणि निर्जीव दिसते. तेव्हा त्वचेला निरोगी आणि ताजतवानं ठेवण्यासाठी मॉइश्चरायझरच्या सोबतीने तेलाची मालीश केली तर तुमचं सौंदर्य अनेक पटींनी खुलेल.  डॉक्टर काय म्हणतात?  डर्मेटोलॉजिस्ट डॉ. निवेदिता म्हणतात की, "कोरड्या हिवाळ्यात कोणतेही मॉइश्चरायझिंग लोशन किंवा तेल न लावल्याने रक्तवाहिन्यांना झालेल्या नुकसानामुळे त्वचेतून रक्तस्त्राव होऊ शकतो. प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी तेलांचा वापर केला जात आहे आणि ते केवळ मसाजसाठीच नव्हे तर मॉइश्चरायझिंग, त्वचा घट्ट करण्यासाठी आणि स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे.”  जाणून घ्या शरीरावर तेल लावण्याचे आश्चर्यकारक फायदे : हिवाळ्यात त्वचा कोरडी पडल्यामुळे संपूर्ण शरीराला खाज सुटूते तर कधी त्वचा पांढरी फटक पडते. या सगळ्याचं कारण दडलंय ते शरीरातील moisture कमतरतेत. या डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी, हिवाळ्यात अंघोळ कर...

निरोगी शरीर

निरोगी शरीर (health) हवे असेल तर शरीराचा प्रत्येक अवयव निरोगी असणे महत्वाचे ठरते. निरोगी राहण्यासाठी चांगल्या आहारासोबतच योग्य वजन (weight) राखणेही आवश्यक आहे. बर्‍याच लोकांना चांगला आहार न मिळाल्याने ते अशक्त आणि कमी वजनाचे बनतात, तर काहीजण चुकीच्या खाण्यामुळे लठ्ठ होतात. अशा परिस्थितीत मेटाबॉलिज्म (metabolism) योग्य ठेवणे हा या समस्येवर उपाय ठरू शकतो. चांगले मेटाबॉलिज्म पचन सुधारते आणि शरीर अन्नातून पोषण शोषण्यास सक्षम होते. वाढलेल्या कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि निरोगी वजन राखण्यासाठी, शरीरातील मेटाबॉलिजमची काळजी घेतली पाहिजे. मेटाबॉलिजम वाढवण्याचे व कॅलरी बर्न करण्याचे काही उपाय जाणून घेऊया. स्वयंपाकाच्या तेलाकडे लक्ष द्या मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी मीडिअम चेन ट्रायग्लिसराइड (MCT)वापरा. नारळाच्या तेलासारख्या एमसीटीमध्ये लॉरिक ॲसिड भरपूर असते जो मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी काम करतो. थंड पाण्याने अंघोळ करा व कॅलरी कमी करा थंडी वाजल्यामुळे ब्राऊन फॅट ॲक्टिव्हेट होते. गार पाण्याने अंघोळ केल्यामुळे फ्रेश वाटते आणि फिटनेसही वाढतो. मसल्ससह मेटाबॉलिक रेट वाढवा मसल्स वाढल्याने इन्सुलिनची संवेदनशील...

MPSC Success Story

  नाव :-  विशाल दिलीप धेडे शिक्षण :-  B.E. ( E & TC) मिळालेली Post :-  विक्रीकर निरीक्षक अभ्यासाची पद्धत :-  Self Study ( at home not even in library) तेसुध्दा Full Time Parmanent Job करत करत. माझ्या प्रवासाबद्दल :-       मी २०१२ मध्ये सहज STI ची परीक्षा दिली होती (काहीही अभ्यास न करता). मी ती पूर्वपरीक्षा पास झालो पण मुख्य परीक्षेवर काहीच लक्ष दिले नाही. माझा JOB पण सुरु होता. आणि मनामध्ये १ न्यूनगंड होता कि MPSC पास होण्यासाठी खूप खूप अभ्यास करावा लागतो, दिवस रात्र १ करावी लागते, तेव्हा कुठे Post मिळते. आणि आपण तर Job करतो. दिवसातले १२ तास तर Job मध्येच जातात. मग आपण कसे पास होणार, ही Negativity माझ्यात होती. त्यामुळे मी अपेक्षेप्रमाणे मुख्य परीक्षेमध्ये Fail झालो.       त्यानंतर मी थोडा थोडा अभ्यास सुरु केला. २०१३ मध्ये PSI ची ७१४ जागांची जाहिरात आली. PSI हे माझे AIM नव्हते पण फक्त Confidence वाढण्यासाठी मी परीक्षा दिली. मी पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालो. Physical Exam नाही दिली. पण माझा Conf...

Money

Image
 

लोकसंख्याविषयक महत्वाचे

Image
  लोकसंख्याविषयक महत्वाचे 1. जनगणना - गृह मंत्रालयांतर्गत 2. जनगणना प्रारंभ - 1872 3. जनगणना आयुक्त पद निर्मिती - 1881 4. जनगणना अधिनियम - 1948 5. कुटुंब नियोजन कार्यक्रमास सुरुवात - 1952 6. जन्म - मृत्यू नोंदणी अधिनियम - 1969 7. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापना - 1993 8. पहिले लोकसंख्या धोरण - 1976 9. दुसरे लोकसंख्या धोरण - 2000 लोकसंख्या विषयक सिद्धांत 1. माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत - प्रबंधाचे नाव - An essay on the principles of Population लोकसंख्या "भूमितीय पद्धतीने" (2,4,6,8.....) वाढते , तर अन्नधान्य उत्पादन "अंकगणितीय पद्धतीने"(1,2,3,4....) वाढते.

उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश

  उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश :- » दोन्ही गोलार्धात साधारण ५अंश ते २० अंश अक्षांश दरम्यानच्या खंडांतर्गत भागात हा प्रदेश आहे. » येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७५ ते १५० सेंमी. आहे. » प्रदेश विस्तृत, सपाट, मैदानी किंवा पठारी आहेत. . » गवत उंच, मध्यम किंवा खुरटे असते. » अधूनमधून दिसणार् ‍ या व फुलांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षांमुळे या प्रदेशाला बागेचे स्वरूप येते. म्हणून त्यास उद्यानभूमी असेही म्हणतात.

Motto

 On this blog , you will get knowledge posts in marathi language.. The posts are for educational purpose only... You will get posts in marathi language